पुस्तक पेढ़ी BOOK BANK

Student Application

पहिल्यांदा फॉर्म येथे भरावा
Please submit form first
Click Here


  • फॉर्म भरल्यानंतर एकूण ४ डॉक्युमेंट्स bookbank@siddhivinayak.org ह्या ई-मेल आयडी वर पाठवावे


Student Application Status
- LAST DATE OF APPLICATION
31 August 2024
- Books Distribution as per availability in stock

Institution Enrollment

  • फॉर्म भरल्यानंतर एकूण ७ डॉक्युमेंट्स bookbank@siddhivinayak.org ह्या ई-मेल आयडी वर पाठवावे


Institution Log in

Student Enrollment Process
विद्यार्थी नावनोंदणी प्रक्रिया ( विद्यार्थी नोंदणी कालावधी जून ते ऑगस्ट )

The process is to apply online
  1. the subbmissition of the application this will be treated as online application
  2. Fee payment online - the refund will be done to the same UPI details as provided
  3. all the documents listed to be send to email : bookbank@siddhivinayak.org Click on more for detail steps
the application will be processed only after receving the documents over email.

Detailed steps ......more »


संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (अटी/निकष) ( संस्था नोंदणी कालावधी जून ते सप्टेंबर )


  1. शैक्षणिक संस्था ही सामाजिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असल्याबाबत प्रमाणपत्राची प्रत.
  2. संस्थेचे उद्दीष्ट शैक्षणिक असणे आवश्यक राहिल. त्यासाठी संस्थेचे बायलाँज (उपविधी ) प्रत जोडावी.
  3. संस्थेकडून प्रस्थापित / नियंत्रित शाळा / महाविद्यालय हे शासनमान्य असावे. या पृष्ट्यर्थ शासनमान्यता / शासननिर्णय याची प्रत जोडणे आवश्यक राहील.
  4. वाचनालय असलेल्या शाळा / महाविद्यालय यांना प्राधान्य देण्यात येईल.
  5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक शाखा निहाय व इयत्ता निहाय ( कला, वाणिज्य, विज्ञान ११ वी ते १५ वी) यादी प्राचार्यानी प्रमाणित करून प्रस्तावासोबत पाठविणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव केशरी शिधापत्रिकेत समाविष्ट असले पाहिजे.
  6. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व गरजू असल्याबाबत प्राचार्यांनी खातरजमा करून तसे प्रमाणपत्र स्वतःच्या स्वाक्षरीने देणे बंधनकारक असेल. अन्यथा पुस्तकपेढी योजनेतून पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तसेच विद्यार्थ्याचे नाव केशरी शिधापत्रिकेत सामाविष्ट असले पाहिजे.
  7. मुख्याधापक / प्राचार्यांनी प्रमाणपत्रावर केलेल्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पँनकार्डाची व ओळखपत्राची छायांकीत प्रत स्वयं स्वाक्षांकित करून पाठवावी.
  8. संस्थेला एकदा पुस्तके दिल्यानंतर अभ्यासक्रम बदलल्याखेरीज पुढील ३ वर्षे पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तथापि संस्थेची विद्यार्थी संख्या वाढल्यास सदर वाढीची शासन मान्यता / शासन निर्णयाच्या अधिन राहून वाढीव विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्यात येतील. तसेच दर वर्षी वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दि. १० जून पुर्वी विद्यार्थ्या कडून परत घेतलेल्या पुस्तकांचा इयत्ता निहाय व शाखा निहाय गोषवारा संबधित संस्थेने / महाविद्यालयाने न्यासास पाठविणे बंधनकारक आहे.
  9. प्राचार्य /मुख्याध्यापकांनी शाखा निहाय व इयत्ता निहाय आवश्यक असलेल्या पुस्तकांची लेखकांच्या नावासहित यादी सादर करून पुस्तकांची मागणी करावी. सदर यादी तपासून पुस्तकांचे वितरण न्यासाकडून केले जाईल.
  10. ज्या महाविद्यालयांना न्यासाकडून पुस्तके पुरविण्यात आली आहेत त्यांच्या पुस्तकांचे व अभिलेखांची न्यासाकडून संस्थेला भेट देऊन तपासणी करण्यात येऊ शकेल.

संस्थांसाठींचे निकष ......अधिक »